सात महिन्याच्या बाळाची यकृताच्या कर्करोगावर मात

Dr. Pranav Jadhav. Oriana Clinic
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया:
seven month baby beat liver cancer, seven month baby beat liver cancer

 पिंपरी/ पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग)- डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय संशोधन केंद्र येथे सात महिन्याच्या बाळावर यकृताच्या कर्करोगाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली 11 सेंटीमीटरची व 460 ग्राम वजनाची यकृतामधील कर्करोगची गाठ काढण्यात डॉक्टराना यश मिळाले. बाळाचा कर्करोगाशी लढा यशस्वी._

हडपसर येथील सात किलो वजन असणारे एका सात महिन्याच्या बाळाला पोटाचा त्रास होत असल्याने त्याला ऍडमिट करण्यात आले होते. त्याची सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळी प्रथमदर्शनी असे दिसून आले की बाळाच्या यकृतामधील डाव्या बाजूस गाठ असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयाच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागात पुढील उपचारसाठी त्याला दाखल करण्यात आले तातडीने बाळाचे सी टी स्कॅन व रक्त तपासण्या करण्यात आल्या त्याअंती असे निदान झाले की यकृतामधील गाठ ही कर्करोगाची आहे. तात्काळ ही गाठ काढून त्यावर पुढील उपचार करणे गरजेचे आहे अन्यता त्याचा इतरही अवयवांवर परिणाम होऊ शकतो व त्याच्या जीवालाही धोका उध्दभवू शकतो. बाळाच्या उपचाराबाबत सकारात्मक व नकारात्मक परिणामांची कल्पना कुटुंबियांना देण्यात आली त्यांचे समुपदेशन करून बाळावर उपचार सुरू केले. तात्काळ या बाळावर ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान जीवाला कोणताही धोका न होता. शरीरात कुठे ही कर्करोगाचा संसर्ग होऊ नये याची बारकाईने काळजी घेत ही शस्त्रक्रिया सुमारे तीन तासात पूर्ण झाली. यकृतामधील डाव्या भागासह कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. ही गाठ सुमारे 11 सेंटिमीटरची होती तर तीचे वजन 460 ग्राम इतके होते. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली लहान मुलांचे अतिदक्षता विभागात त्याला दाखल करण्यात आले होते काही दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते बाळाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या चिंताजनक स्थितीतून बाळास बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. बाळाच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या असून त्याला कोणताच धोका नाही इतर आरोग्याबाबत कोणतेही दोष आढळले नाही हे बाळ सुखरूप आहे. त्याला सामान्य वार्ड मध्ये हलवले आहे तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून दोन दिवसांनी त्या बाळाला घरी सोडण्यात येईल. रुग्णालयातील अद्ययावत सेवा सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शस्त्रक्रियागृह, जलद सेवा देणारी वैद्यकीय यंत्रणा व विविध वैद्यकीय शाखेतील तज्ञ् डॉक्टर्स यांच्या साहाय्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आम्हाला यश मिळाले तसेच योग्य वेळीच निदान व उपचार केल्याने हे बाळ कर्करोग मुक्त झाले असे मत बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले ही शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आली आहे.

या शस्त्रक्रियेसाठी बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव, यकृत प्रत्यारोपण तज्ञ् डॉ. दिनेश झिरपे, भूल तज्ञ् प्राध्यापक डॉ. छाया सूर्यवंशी, बालरोग भूल तज्ञ् प्रा. डॉ. दीपाली पाटील, सहायक प्रा. डॉ. स्मिता उभे व डॉ. स्मिता जोशी भूलशास्त्र विभागप्रमुख तसेच बालरोग व बालरोग शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांचे पथक तसेच लहान मुलांचे अतिदक्षता विभागामधील सर्वांचे या यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करण्यात मोलाचे योगदान आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर यांनी या सात महिन्याच्या बाळावर केलेल्या यशस्वी उपचाराबद्दल यात सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.

Courtesy: Maharashtra Breaking

Total Page Visits: 4561 - Today Page Visits: 7