बाळाच्या पोटातून काढला गर्भ

Dr. Pranav Jadhav - DY Patil Hospital Team

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे एका १८ महिन्यांच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळला.

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे एका १८ महिन्यांच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळला. ही दुर्मीळ घटना असल्याचे सांगण्यात येत असून, याला वैद्यकीय भाषेत fetus in fetu असे म्हणतात. बाळाच्या सर्व तपासण्या करून हा अविकसित मृत गर्भ काढण्याचे आव्हान डॉक्टरासमोर होते. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचे मृत गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

नेपाळमधील रहिवाशी असलेल्या महिलेची १८ महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला. या बाळाच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या व त्याचे पोट वाढत होते. त्याच्या उपचारासाठी बाळाच्या आई-वडिलांनी डॉ. शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली.

रेडिओलॉजिस्ट डॉ. विकास जाधव आणि डॉ. संजय खळदकर यांनी सोनोग्राफी व सी. टी. स्कॅनचे मूल्यमापन केले. हा गर्भ अविकसित व मृत असल्याचे दिसले. गाठ काढण्यात बालशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव व त्यांच्या टीमला यश मिळाले. ही शस्त्रक्रिया सहा तासांत पूर्ण झाली. डॉ. शिल्पा बाविस्कर यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात बाळावर उपचार झाल्यावर बाळाला घरी सोडण्यात आले आहे.

आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पुढे जन्मानंतरही बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत होती. त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. त्याच्या इतर अवयवांवर भविष्यात गंभीर परिणाम झाला असता. त्यासाठी ही गाठ काढली. पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मीळ घटना घडते.

– डॉ. शैलजा माने,

बालरोग विभाग, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी

Courtesy: Maharashtra Times

Total Page Visits: 1908 - Today Page Visits: 3